राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. शिवाय, ओमायक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कडक पावलं उचलली जात असून, निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात करोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

तर, आज राज्यात १ हजार ४४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे.

Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
5 Zika virus patients died in Pune Print news
धोका वाढला! पुण्यात झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या शंभरवर पोहोचली
whatsapp special campaign focused on small businesses
छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम
Mukhyamantri Yojana Doot initiative to inform people about various schemes of government
नागपूर : योजनादूतांना दरमहा १० हजार, ‘ येथे ‘संपर्क साधा
In Pune the number of chikunguniya patients has doubled with dengue
पुण्यात डेंग्यूसोबत चिकुनगुन्याचा ‘ताप’! रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आरोग्य विभाग धास्तावला
pune blood platelet shortage marathi news
पुण्यात आधीच डेंग्यूचा धोका अन् त्यातच आता रक्तासह प्लेटलेटचा तुटवडा
houses sold mumbai, houses sold August mumbai,
मुंबई : ऑगस्टमध्ये ११ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्क दरात कपात होण्याच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यात आज रोजी एकूण ३२,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. आजपर्यंत राज्या १४१५३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज ४५१ रूग्ण करोनामुक्त झाले, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या २२ हजार ३३४ आहे. तर, एकूण ७५०१५८ जण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल मुंबईत ५ हजार ६३१ करोनाबाधित आढळले होते.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राज्यात ६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे‍ वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत.
रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
· पुणे ग्रामीण:- ३
· पिपरी चिचंवड मनपा- २
· पुणे मनपा-१

आजपर्यंत राज्यात एकूण ४६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १८० रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.