सांगली : ईडी आणि सीबीआय हे भ्रष्टाचाराविरोधातील शस्त्र नसून, अन्य पक्षातील नेत्यांना मोदींच्या जवळ आणणारं अस्त्र आहे. विरोधकांना धमकावून कमकुवत करायचं आणि मोदी सरकार मजबूत बनवायचं काम ईडीच्या माध्यमातून होत आहे, अशी टीका ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड वृंदा करात यांनी केली. करात यांना आज सांगली जिल्ह्यातील विटा येथे प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारच्या माध्यमातून तत्कालीन खासगी सावकार आणि महाजन यांच्या सावकारी विळख्यातून शेतकऱ्यांना मुक्त केलं होतं. मात्र आताच्या केंद्र सरकारच्या काळात, बँकांकडून फक्त मोठ्या उद्योगपतींचं करोडो रुपयांच कर्ज माफ केलं जातंय, अशी टीकाही करात यांनी केली.

हेही वाचा- राज्यपाल हे भाजपाचे एजंट अन् RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते, अमोल मिटकरींची भगतसिंह कोश्यारींवर बोचरी टीका

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि कृतिशील समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठच्या माध्यमातून या पुरस्काराच वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर होत्या. सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, ॲड. सुभाष पाटील आदी मान्यवरही या सोहळ्यास उपस्थित होते.