सातारा : महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून नऊ कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, पावसामुळे पश्चिमेला भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. सोमवारी महाबळेश्वरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात १०६.६० मि. मी(८७०मिमी), कोयना १०२मिमी (एकूण ९४५ मिमी ) तर साताऱ्यात ३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. धोम १८मिमी २२८ मिमी६१मिमी (४७२) कण्हेर ४४मिमी(१९६) उरमोडी ५६मिमी(२३१) तारळी ५६मिमी(२७८)

आणखी वाचा-जून महिना संपला तरी साताऱ्यातील धरणसाठे रीतेच

सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढला. महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, पाटण तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे.

पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली मुख्य रस्त्यावरच माती दगड आल्याने तापोळा भागामध्ये जाण्यासाठी एका बाजूने वाहतूक सुरु होती सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी जेसीबी च्या साहाय्याने माती दगड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू होते. महाबळेश्वर येथे दिवस-रात्र पाऊस सुरू आहे.