हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरात रयतेला स्वराज्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व अन्य मान्यवर नेत्यांनीही आजच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन छत्रपतींना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचीही भर पडली आहे. सचिननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मराठीमधून केलेल्या ट्विटला त्याच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. समृद्ध आणि कणखर महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानवंदना वाहण्यात येत असून, विविध माध्यमातून अनेकांनीच या राजाचं राजेपण जपत त्यांना अभिवादन केल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader