पोलीस भरतीसाठी मदानी चाचणीसाठी व लेखी परीक्षेसाठी वेगवेगळे उमेदवार बसवण्याचा प्रकार लेखी परीक्षेदरम्यान उघडकीस आला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संतराम मधुकर शहाणे (वय ३३ ,रा.परभणी सध्या मु. पो. नांदेड) व भगवान तुकाराम कांबळे (रा.नांदेड)या दोघांनी संगनमताने परीक्षा देण्याची तयारी केली. लेखी परीक्षेसाठी भगवान कांबळेच्या जागेवर संतराम शहाणे बसला होता.लेखी परीक्षेपूर्वी केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत हे परीक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संतराम शहाणेला अटक करण्यात आली तर कांबळेला अटक करण्यासाठी पोलीस पथक नांदेडला रवाना करण्यात आले आहे.पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपीक दिलीप राऊत यांनी या बाबत तक्रार दिली आहे.
पोलीस परीक्षेसाठी बनावट उमेदवार प्रकरणी गुन्हा
पोलीस भरतीसाठी मदानी चाचणीसाठी व लेखी परीक्षेसाठी वेगवेगळे उमेदवार बसवण्याचा प्रकार लेखी परीक्षेदरम्यान उघडकीस आला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
First published on: 24-06-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against fake candidate in case of police test