बीड – भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्दाचे वक्तव्य केले होते. या प्रकारामुळे मुस्लिम समाजातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी होत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द काढले होते. तेंव्हापासुन मुस्लिम समाजात शर्मा विरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. ॲड. सय्यद अजीम यांच्या तक्रारीवरून बुधवारी नूपुर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी १० जून रोजी आष्टी, चौसाळा (ता.बीड) येथील व्यापार्यांननी कडकडीत बंद पाळला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी मुस्लिम समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर काही तासातच शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Story img Loader