येथील एका प्राथमिक शाळेत ९ वर्षांच्या मुलीवर भरवर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश दत्तात्रय भोसले असे या शिक्षकाचे नाव असून अद्याप तो फरारी आहे. हा शिक्षक वर्ग सुरु  असताना संबंधित मुलीवर गेल्या काही दिवसांपासून अतिप्रसंग करत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरु  असलेल्या या प्रकारामुळे वर्गातील अन्य मुलींमध्ये घबराट निर्माण झाली होती. यातूनच काही मुलींनी आपल्या पालकांना संबंधित शिक्षकाचा हा प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली. दरम्यान, यानंतर शाळा व्यवस्थापनाने या शिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा घेतला, पण याबाबत कुठलीही पोलीस तक्रार केली जात नव्हती. याबाबत पालक आणि शहरातील नागरिकांचा संताप वाढल्यावर  या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader