येथील एका प्राथमिक शाळेत ९ वर्षांच्या मुलीवर भरवर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश दत्तात्रय भोसले असे या शिक्षकाचे नाव असून अद्याप तो फरारी आहे. हा शिक्षक वर्ग सुरु असताना संबंधित मुलीवर गेल्या काही दिवसांपासून अतिप्रसंग करत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे वर्गातील अन्य मुलींमध्ये घबराट निर्माण झाली होती. यातूनच काही मुलींनी आपल्या पालकांना संबंधित शिक्षकाचा हा प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली. दरम्यान, यानंतर शाळा व्यवस्थापनाने या शिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा घेतला, पण याबाबत कुठलीही पोलीस तक्रार केली जात नव्हती. याबाबत पालक आणि शहरातील नागरिकांचा संताप वाढल्यावर या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा