राहाता : शहराजवळील साकुरी येथील ऍ़क्टीव्ह सोशल क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या १८ जणांकडून १४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पोलीस यांनी संयुक्त कारवाई करीत जप्त केला. इतक्या दिवस हा सोशल क्लब कोणाच्या आशिर्वादाने सुरू होता. याविषयी शहरात चर्चेला उधाण आले आहे.अचानक या क्लबवर का? कारवाई करण्यात आली याचे कोडे मात्र शहरवासीयांना उलगडण्यास तयार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकुरी येथे सचिन बनसोडे, (रा.साकुरी, ता.राहाता) हा ऍ़क्टीव स्पोर्टस क्लब या नोंदणी केलेल्या क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित आहे.याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण व त्यांच्या पथकाने ऍ़क्टीव्ह स्पोर्टस क्लब येथे छापा टाकला असता तेथील एका खोलीत दोन ठिकाणी काही व्यक्ती तिरट नावाच्या पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना आढळून आले.छाप्या दरम्यान दोन व्यक्ती पळून गेल्या याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता सचिन योसेफ बनसोडे हा पत्त्याच्या क्लबचा मालक असल्याचे सांगीतले.सदर ठिकाणी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी सदर क्लबमध्ये रमी पत्त्यांचे नावाखाली पत्त्यांवरपैसे लावून तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळत असल्याने सांगीतले.

गणेश विठठल जेजुरकर, (वय ३५, रा.राहाता), कैलास अशोक मंजुळ, (वय २९, रा.कोपरगाव), इक्बाल सैफु शेख, (वय ३५, रा.शिर्डी), अक्षय आप्पासाहेब खोतकर, (वय २६, रा.खंडोबा गल्ली, राहाता), सचिन मधुकर बारे, (वय ३५, र सिन्नर), ज्ञानदेव नामदेव गव्हाणे, (वय ४२, रा.आडगाव, ता.राहाता), विजय अगस्तीन वाघमारे, (वय ५०, रा.पिंपळस, ता.राहाता), भाऊसाहेब रामराव चौधरी, (वय ३५, रा.रूई, ता.राहाता), संदीप सुधाकर अभंग, (वय २८, रा.पळाशी, ता.नांदगाव, जि.नाशिक), सचिन योसेफ बनसोडे, (वय २६, ता.साकुरी, ता.राहाता) महेश हरी लोखंडे, (वय २३, रा.पिंपळस, ता.राहाता) अनिस नसीर शेख, (वय ५०, रा.कोल्हार, ता.राहाता), वसंत लक्ष्मण वडे, (वय ६४, रा.येवला, ता.येवला, जि.नाशिक) समीर रफिक पटेल, (वय २२, रा.कोल्हार, ता.राहाता) मनोज लक्ष्मण मोरे, (वय ४८, रा.साकुरी, ता.राहाता), सोमनाथ लक्ष्मण भगत, (वय ४४, रा.घोटी, ता.इगतपुरी, जि.नाशिक) उत्तम रामराव कोळगे, (वय ५८, रा.नांदुर्खी, ता.राहाता) हमराज सर्फराज कादरी, (वय ५५ रा.शिर्डी, ता.राहाता) दोन डावामध्ये खेळत असलेल्या वरिल व्यक्तींना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन एकुण १४ लाख १६ हजार रुपये किमतीचे त्यात रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल, कार, डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीविरूध्द राहाता पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ), ४ , ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.