येथील धनंजय ऊर्फ बापूसाहेब जाधव यांना खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा पोलिसात नोंदवण्यात आली आहे.
या बाबत जाधव यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे- मंगळवारी रात्री रामदास कार्वे याने जाधव यांच्या सांबरवाडी येथील हॉटेलमध्ये मद्यपान केले. त्यानंतर त्याने बिल देण्यावरून वादावादी केली. साडेअकरा वाजता जाधव हॉटेल बंद करून निघाले असता कार्वे याने त्यांचा रस्ता अडवला आणि एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच त्यांच्या खिशात हात घालून खिशातले सहा हजार रुपये हिसकावून घेतले, तसेच त्यांच्या गाडीवर मोठा दगड टाकून काच फोडली. या संदर्भात जाधव यांनी सातारा पोलिसात तक्रार दिली आहे.

Story img Loader