महाराष्ट्रात १३ ऑगस्टला बदलापूरच्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची ( Crime News ) धक्कादायक घटना घडली. त्यानंतर २० ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. मात्र महाराष्ट्रात ही एकच घटना घडलेली नाही. १३ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात अशाच घटना ( Crime News ) घडल्या आहेत. या घटना ( Crime News ) मन सून्न करणाऱ्या आणि तेवढीच चिड आणणाऱ्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं १३ ऑगस्टपासून?

१३ ऑगस्ट – बदलापूरातील शाळेत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

१४ ऑगस्ट – शाळेतील शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

१४ व १५ ऑगस्ट – १३ वर्षांच्या मुलीला गुजरातला नेऊन तिच्यावर अत्याचार

१५ ऑगस्ट – पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

१६ ऑगस्ट – धारावीमध्ये खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

२० ऑगस्ट – अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग, नागपूरच्या कामठी भागात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार

२१ ऑगस्ट – अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार, कांदिवलीमध्ये १४ वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग, पुण्यामध्ये शाळकरी मुलीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार, सातारामध्ये वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

२२ ऑगस्ट – कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, वाशीम जिल्ह्यात शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग, अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

२३ ऑगस्ट – अकोल्यात १० वर्षीय मुलीवर अत्याचार, ठार मारण्याची धमकी

नालासोपारा पुन्हा हादरले, अल्पवयीन मुलीवर दोघांचा सामूहिक बलात्कार

१३ ते २३ ऑगस्ट या कालावधीत मन सून्न करणाऱ्या घटना

१३ ते २३ ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत या घटना ( Crime News ) घडल्या आहेत. बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. बदलापूरच्या घटनेचा प्रचंड प्रक्षोभ पाहण्यास मिळाला. मात्र या घटनाही अशाच मन सून्न ( Crime News ) करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातल्या या घटना म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्ववार झालेला आघात आहेत. मुली, महिला यांच्यावर झालेल्या या अत्याचाऱ्यांच्या घटनांनी प्रत्येकाचं मन सून्न झालं आहे. यावर उपाय आहे तो म्हणजे कठोर शिक्षेचाच. जोपर्यंत स्त्रीच्या स्त्रीत्वचा अपमान करणाऱ्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या घटना ( Crime News ) आणि त्याच्या बातम्या समोर येतच राहणार आहेत. बदलापूरमध्ये जो जनक्षोभ उसळला त्या आंदोलकांचंही म्हणणं हेच होतं की आरोपीला तातडीने फाशी द्या. आरोपीला तातडीने फाशी देणं हे कायदेशीर तरतुदीत बसत नाही हे आपल्याला माहीत आहे. मात्र जनभावना किती तीव्र झाल्या आहेत हेदेखील विसरता येणार नाही. त्यामुळे आरोपींना जबदरदस्त जरब बसली पाहिजे असं झालं तर स्त्रीची, मुलीची आणि तिच्या आत्मसन्मानाची विटंबना करण्यासाठी हे हात धजावणार नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news marathi news maharashtra crime incidents in last 10 days scj