धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी हिंदी चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्मा यांनी सोशल साइटवरून (ट्विटर) गणेशभक्तांच्या भावना दुखावणारा मजकूर ट्विटरवर टाकला होता. ‘जो स्वत:चे शीर वाचवू शकत नाही, तो इतरांचे शीर काय वाचवणार’ अशा आशयाचा मजकूर वर्मा यांनी प्रसिद्ध करताच त्याची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेकांनी वर्मा यांच्यावर टीकेची झोड उठवली. हा मजकूर टाकल्यानंतर काही तासांतच वर्मा यांनी माफीही मागितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, गणेशोत्सवाच्या दिवशीच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल येथील अमित शहाजी भांगे (समर्थनगर) यांनी शुक्रवारी वर्मा यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी वेगवेगळय़ा कलमान्वये गुन्हा दाखल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा