जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात इंस्टाग्रामच्या माध्यमातून बिटकॉइन संदर्भात मेसेज पाठवून फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. पाठवलेल्या मेसेजची लिंक ओपन करताच संबंधित हायकरकडून आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शंभरहून अधिक मुलींचेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- रिपोर्टरने जानेवारीचे स्पेलिंग विचारताच शिक्षिकेने जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Viral Video

सोशल नेटवर्किंग साईट धारकांना फटका

इंस्टाग्राम या सोशल नेटवर्क साईटचा तरुण मंडळींकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांचा डोळा इंस्टाग्राम साईटवर आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसात सायबर गुन्हेगारांनी लाखो इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचे समोर आले असून त्याचा फटका इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट धारकांना बसला आहे. सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्या अगोदर तुम्हाला एक मेसेज पाठवतात ज्यात म्हटले असते की, तुमचा अकाउंट हॅक करण्यात आलेला आहे तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करा. मग आपण संबंधित लिंकवर क्लिक करताच तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम अकाउंटला नवीन पासवर्ड बदलण्यासाठी विचारले जाते आणि नवीन पासवर्ड टाकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची संपूर्ण प्रोफाईल ही ताबडतोब सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. नाहीतर सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम युजरला एक बनावट लिंक पाठवतो व त्याला काही कार्य करण्याचे आदेश करतो त्या आदेशाचे पालन करताच इंस्टाग्राम युजरचे अकाउंट हॅक करण्यात येते.

हेही वाचा- ध्वनीप्रदुषणासाठी ‘अलेक्सा’ नाही, तुम्हीच जबाबदार; हायकोर्टाचा हॉटेल मालकाला दणका

धुळ्यात १०० हून अधिक मुलींचे अकाऊंट हॅक

इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्यानंतर सायबर गुन्हेगार आपण दिलेल्या ई-मेल आयडी व पासवर्ड बदलून टाकतो व आपल्या अकाउंटद्वारे आपल्या परिचयातील लोकांना मेसेज पाठवतो आणि त्यांना देखील पासवर्ड बदलण्यास सांगतो, अशा पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. शंभरहून अधिक जणांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात मुलींचा सर्वाधिक म्हणजे ९९% समावेश आहे.

अकाऊंट हॅग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी

याप्रकरणी धुळे सायबर सेलेकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी इंस्टाग्राम अकाउंट वापरताना आलेल्या कोणत्याही मेसेज वर क्लिक न करता त्याची शहानिशा करावी, ज्या व्यक्तीकडून हा मेसेज आला आहे त्या व्यक्तीला फोन करून त्या मेसेजची पुष्टी करावी. तसेच एखाद्या तज्ञकडून आपले अकाउंट सिक्युअर करून घ्यावे. जेणेकरून आपले अकाउंट कोणी हॅक करू शकणार नाही, तसेच पंधरा दिवसात आपला पासवर्ड चेंज करावा. इत्यादी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime100 girls instagram account hack in dhule rno news dpj
Show comments