डॉ. पद्मसिंह पाटील यांना राजकीयदृष्टय़ा त्रास देणारा व्यक्ती म्हणून काँग्रेसचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्ह्य़ात ख्याती असल्याने तुळजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत दस्तुरखुद्द शरद पवार यांची प्रचाराची भाषा घसरली. २१ टीएमसी पाणी आणण्यासाठी पुन्हा एकदा निवडणुकीत उतरल्याचे सांगणाऱ्या मधुकरराव चव्हाणांवर खालच्या पातळीवर पवारांनी टीका केली. त्यांच्या तोंडून निघालेला हा शब्द प्रचाराची पातळी सोडून असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्य़ात उमटली आहे.
राज्यातील दुष्काळी, गारपीट, टंचाई अशा मदतीचे निर्णय आपण घेतले असून काँग्रेसकडून श्रेय घेण्याचे राजकारण केले जात आहे. आघाडी सरकारला आपण केंद्र सरकारमधून सातत्याने मदत केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून घेण्यात येणारा श्रेयाचा दावा एकांगी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, राज्य सरकारमध्ये आघाडी असताना झालेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रकार चुकीचा आहे. आपण मोठय़ा प्रमाणात शेतकरी नुकसानीत असताना मदत केली. गारपिटीची उस्मानाबाद जिल्ह्यात मीही पाहणी केली व दिल्लीत बठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी आपणच ते काम केल्याचा प्रचार चालविला आहे. यावेळी मधुकर चव्हाण यांचे नाव घेऊन पवारांनी त्यांच्यावर टीका केली.
जनतेला न्याय देणारा जीवन गोरे हा उमेदवार सर्वार्थाने योग्य आहे. हाती आलेल्या पदाला त्यांनी न्याय देताना जनतेला त्याचा फायदा करून दिला आहे. जिल्हा परिषदेचा राज्यात लौकिक मिळविणारा प्रशासक व एसटी महामंडळाचे कुशल नेतृत्व अशा शब्दात गौरव केला. तर मधुकररावांचे वय खूप झाले आहे. या वयात इतरांना उभे करणे योग्य, असा चिमटाही पवारांनी घेतला.
डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या जिल्ह्याची ४० वष्रे सेवा केली. त्यांचा लोकसभेतील पराभव मला दु:ख देऊन गेल्याचे पवार म्हणाले.
व्यासपीठावर माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, उमेदवार जीवन गोरे, संजय गायकवाड, राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, सुरेश देशमुख, आदींची उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा