रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातल्या मगरींच्या मुक्त वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण चिपळूण शहरातल्या चिंचनाका परिसरात महाकाय मगर नागरी वस्तीत दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रविवारी रात्री महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्याने प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाल. प्रशासनाने मगरीला नदीपात्रात सोडावं तसंच त्या बाहेर येऊ नये यासाठी कार्यवाही करावी ही मागणी होते आहे.

शिव नदीच्या पात्रात मगरींचा वावर

चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा प्रचंड वावर आहे. चिपळूणमधल्या चिंचनाका भागात मगर रस्त्यावर आढळून आली त्यामुळे खळबळ उडाली. शिव नदीच्या पात्रात मगरींचा प्रचंड वावर, पावसाळ्यात या मगरी शहरात मानवी वस्तींमध्ये वावरताना दिसून येतात.

रस्त्यावर मगर आल्याने खळबळ

रविवारी रात्री अशीच एक भली मोठी मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची देखील चांगलीच बोबडी वळली. प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा रस्त्यावरील व्हिडीओ फोनमध्ये चित्रित केला. त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मगरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. मानवी वस्तीमध्ये मगरींचा मुक्त वावर हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे.

हे पण वाचा- VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ बिबट्याची चलाख चाल अन् मगरीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

चिपळूणमधून वाहणाऱ्या वशिष्ठी आणि शिव नदीपात्रातून अनेकदा मगरी शहरात येत असतात. यापूर्वी देखील मगरी शहरी भागात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मानवी वस्तीत मगर आढळून आल्याने खळबळ उडाली. काही प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा व्हिडीओ फोनमध्ये कैद केले आहेत.

यापूर्वी गोवळकोट भागात मगर आढळून आली होती. आता चिंचनाका भागात मगर आढळून आली आहे. चिंचनाका भागातील मगर मुख्य रस्त्यावर पोहोचली होती. एक रिक्षाचालक आणि कारमधील काही जणांनी मगरीचा व्हिडीओ चित्रित केला. यानंतर या मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला हाल व्हिडीओ व्हायरल होतो आहे.