विधान परिषद निवडणूक: मतदारांना थेट मतदान कें द्रावर आणणार

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदारांचा घोडेबाजार नोटा बंदीमुळे १० लाखांवरून ५ लाखांवर आल्याची चर्चा आहे. चुरस असली तरी नव्या नोटांचे चलन उपलब्ध होत नसल्याने आणि सोन्यातील खरेदीही आयकरच्या देखरेखीखाली असल्याने मतदारांना पहिल्या टप्प्यातील ५ लाखांवरच बोळवण होते की काय? असा प्रश्न पडला आहे. शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी मतदार थेट मतदान केंद्रावरच पोहचविले जाण्याची तयारी दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी केवळ ५७० मतदार असून या वेळी काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात लढत होत आहे. िरगणात चार उमेदवार असले तरी या दोन तगडय़ा उमेदवारांमध्येच चुरस निर्माण झाली आहे. महापालिकेतील सत्ता संघर्ष आणि कदम व दादा गटात असलेला राजकीय गटबाजीचा खेळ यामुळे अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक चुरशीची बनली आहे.

भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र दोन्ही काँग्रेसपकी भाजपाच्या जिल्हा नेत्यांची जवळीक राष्ट्रवादीशी वाढली आहे. राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांना विरोध म्हणून काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा निर्णय वसंतदादा गटाचे विशाल पाटील यांनी जाहीर केला असला, तरी या निर्णयामागे बंडखोरी करून मदानात उतरलेले शेखर माने यांनाही मान्य नाही. यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे. पाटील यांनी घेतलेला हा निर्णय बंडाच्या पवित्र्यात असलेल्या मतदारांना अद्याप मान्य झालेला नसल्याने काँग्रेस पुन्हा अडचणीत आली आहे.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी व बंडखोर गटाचे मतदार सध्या सहलीवर असून घोडेबाजार नोटा बंदीमुळे अद्याप मंदीतच आहे. पहिला हप्ता म्हणून बऱ्याच मतदारांपर्यंत ५ लाखांची टोकन मिळाली असली, तरी पुढील हप्त्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारी बँकांकडे सध्या उच्च मूल्यांच्या नोटांची चणचण असल्याने आणि उधारीवर मतदान कसे करायचे, असा प्रश्न मतदारांसमोर आहे. कोकण, गोवा, काश्मीर आणि उटी येथे बहुसंख्य मतदार सहलीसाठी रवाना झाले आहेत. शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतदारांना थेट मतदान केंद्रावर आणण्याची तयारी करण्यात आली आहे. या मतदारांचा विरोधकांशी थेट संपर्क येणार नाही याची दक्षताही घेतली जात असून मतदारांवर दबाव आणण्यासाठी प-पाहुण्यांकडून दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

Story img Loader