सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार हे ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारे फसवतात. अनेक प्रकरणे अशी आहेत की, सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करुन त्यांची बँक खाती रिकामी केली. आता मुंबईत एक अशीच घटना समोर आली आहे. एका कामगारने कंपनीला गंडा घालून तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केली. मात्र, त्याने मिळविलेले हे १ कोटी ८ लाख रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले.

सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवत फसवणूक करताना आढळतात. या फसवणुकीला सर्वसामान्य बळी पडतात. कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीचीच तब्बल १ कोटी ८ लाखांची फसवणूक केली. झैना इलेक्ट्रीक आणि मेकॅनिक वर्क या खासगी कंपनीत सुधीर मापुस्कर नावाचा व्यक्ती १९९२ पासून लेखापाल म्हणून काम करत होता. अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे त्यांने कंपनीचा विश्वास संपादन केला. त्याने या विश्वासाचा फायदा घेत कंपनीच्या तीन बँक खात्यामधून मोठी रक्कम त्याच्या वैयक्तिक खात्यावर वळविली.

Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mumbai bank fraud andheri midc
Mumbai Bank Fraud: मुंबईत सहा बँक कर्मचाऱ्यांचा ठेवीदारांच्या निधीवर डल्ला; अंधेरीतील शाखेतला प्रकार, गुन्हा दाखल!
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
fake investment apps news in marathi
हे गुंतवणुकीचे नव्हे, फसवणुकीचे मार्ग
A person was cheated online by asking him to pay a monthly subscription for milk thane crime news
ठाणे: ४९९ रुपयांच्या दूधासाठी ३० हजार गमावले
fraud with Depositors by Rajasthan Multistate
‘राजस्थान मल्टिस्टेट’मध्ये ठेवीदारांची फसवणूक
Malegaon software scam loksatta news
मालेगाव प्रकरणी सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली व्यवहार, अमेरिका, सिंगापूर, यूएईमधील कंपन्यांना कोट्यवधीची रक्कम पाठवली

हेही वाचा : सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश

असे मुंबईतील आझाद मैदान पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. या आरोपपत्रात नमूद करण्यात आले की, कंपनीच्या लेखापालने २०१६ ते मार्च २०२३ या कालावधित कंपनीची तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केली. कंपनीच्या मालकाने दाखल केलेल्या तक्रारीत या लेखापालने कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि पगारामधून पैसे वळविले असल्याचे म्हटले आहे.

सदर गुन्ह्याची कबूली अटक करण्यात आलेल्या लेखापालाने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गुन्ह्याची कबूली देताना लेखापालाने सांगितले, २०२१ मध्ये अनेकांनी आपल्याशी संपर्क साधल होता. यामध्ये एक आकर्षक ऑफर देण्यात आली होती. याच ऑफरच्या मोहाला बळी पडून आपण कंपनीत गैरव्यवहार केला. १ कोटी ८ लाख रुपये हे वस्तु सेवा कर, आयकर विभागाचा कर, भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचाऱ्यांचा पगार अशा पद्धतीने हे पैसे आपण घेतले होते. मात्र, मला एका योजनेतून मला नफा मिळाला की कंपनीचा गैरफायदा करत घेतलेले पैसे आपण परत जेथे होते तेथे पाठविणार होतो, असे या लेखापालाने कबूल केले. दरम्यान, या सर्व प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात १५ बँक खाते गोठवली आहेत.

Story img Loader