लोकसत्ता वार्ताहर

दापोली : मंडणगड ते म्हाप्रळ दरम्याने शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरण ठिकाणी दाभोळ – मुंबई एस.टी. बस रस्ता सोडून १५ फुट खाली घसरून पलटी झाल्याने अपघात झाला. सोमवार १३ जानेवारी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी गाडीमध्ये ४१ प्रवासी प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा-Indian Cities With Slowest Traffic : जगातील सर्वात मंद वाहतूक असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये तीन भारतीय; मुंबई-पुण्याचा क्रमांक किती? येथे वाचा संपूर्ण यादी

दापोली आगाराची गाडी (क्र. एम.एच.१४ बि.टी. २२६५) दापोलीहून मुंबईकडे जात होती. गाडीचे चालक व्हि.एस. गावडे हे गाडी घेवुन मंडणगड मधून मुंबईकडे रवाना झाले असता शेनाळे घाटात चिंचाळी धरणा जवळ गाडी रस्ता सोडून सूमारे १५ फुट बाजुला पलटी झाली. यावेळी समोर असलेल्या झाडाला एस.टी अडकल्याने गाडीतील सुमारे ४१ प्रवाशांचे प्राण वाचले. गाडी झाडाला अडकली नसती तर ती खोल दरीतील धरणामध्ये थेट कोसळली असती. अपघातामध्ये दापोली तालुक्यातील सर्व प्रवासी होते. त्यांना सुखरुप गाडी बाहेर काढून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Story img Loader