डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत. तपासाला वेग यावा ही आमची इच्छा आहे. तसेच तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा या साठी आम्ही लवकरच याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन ‘अंनिस’चे कार्यकारिणी सदस्य डॉ. हमिद दाभोलकर यांनी केले.
परिवर्तन कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दाभोलकर आणि सरचिटणीस प्रशांत पोतदार उपस्थित होते. डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले, अंनिसच्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्ती आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास एक वर्ष होते. या निमित्त सातारा येथे िरगण नाटय़ाचे प्रयोग होणार आहेत. अतुल पेठे हे यासाठी वर्षभर प्रयत्न करत आहेत. राज्यातील सर्व शाखा आणि त्यातील कार्यकत्रे नाटय़ स्वत: लिहिणार आहेत, तसेच त्याचे प्रयोग पुणे, मुंबईसह राज्यभरात केले जाणार आहेत. पुण्यात २० ऑगस्ट रोजी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीत िरगण नाटय़ सादर केले जाणार आहे. डॉ. दाभोलकरांचा मारेकरी न सापडल्याबद्दल तीव्र संताप आणि वेदनेच्या सामूहिक प्रकटनासाठी हे प्रयोग केले जातील, असे डॉ.दाभोलकर म्हणाले.
नाटय़ात अंनिसच्या शिकवणुकीचे विषय असतील कारण पुरोगामी सांगितल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात दहा महिन्यांत सातआठ नरबळी धनप्राप्तीसाठी घडतात, हे मागासलेपणाचे निदर्शक आहे. त्यामुळे जातपंचायत, अंधश्रद्धा, बुवाबाजी या विषयावर वर्षभर प्रबोधन केले जाईल. संवेदनशील राजकारणी आमच्या बरोबर आहेत मात्र ते सत्तेत नाहीत त्यामुळे कायदे होण्यास वेळ लागतो. डॉ.एन.डी.पाटील, मेधा पाटकर यांना चळवळीबद्दल आस्था आहे. त्यांची मदत आम्हाला नेहमीच होते असेही डॉ.दाभोलकर म्हणाले. पोतदार यांनी, गेल्या वर्षांत डॉक्टरांच्या माघारी आम्ही काय केले याचा आढावा २० ऑगस्टला घेणार आहोत आणि डॉक्टरांच्या संकल्पना सिद्धीस नेण्याचे प्रयत्न करणार असे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा