यावेळी पाऊस चांगला राहण्याचा अंदाज आहे. पण पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन आहे की पाऊस चांगला येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
हेही वाचा >> सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल
“यावेळी पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण सध्या पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे चांगला पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे शेतकऱ्यांना आवाहन आहे. शेतकऱ्यांना अनुभव आहे त्यामुळे ते पेरणी करणार नाहीत. पाठीमागच्या काळात गावपातळीवर कृषी समित्या केल्या होत्या. आता तालुका आणि जिल्हा पातळीवर कृषी समित्या केल्या जाणार आहेत,” असे दादा भुसे म्हणाले.
तसेच, “किती बियाणे लागणार? किती औषधे लागणार? याचा आढावा घेतला होता. संपूर्ण राज्यासाठी लागणारे बियाणे, खते किंवा अजून काही याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. कोणालाही खते किंवा बियाणे याची कमतरता भासणार नाही,” असेही दादा भुसे म्हणाले.
हेही वाचा >> “मोदींनी सांगून पण अजित पवारांनी भाषण केलं नाही हा…”; अमोल मिटकरींचा देहूमधील भाषण वादावरुन टोला
तसेच, “1 जुलै हा महाराष्ट्रचा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती असून हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून कृषी सप्ताह साजरा केला जाणार असून यामध्ये सर्व कुलगुरू, अधिकारी सहभागी होणार आहेत,” असेदेखील दादा भुसे म्हणाले.
हेही वाचा >> “खडसेंना उमेदवारी न दिल्यास बिनविरोधचा प्रस्ताव”, एमआयएमच्या आरोपावर रावसाहेब दानवे म्हणाले….
तसेच आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केले. विधानपरिषदेच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल. कुठलाही घोडेबाजार होणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.