करोनामुळे सध्या संपूर्ण देशातलं वातावरण ढळवून निघालं आहे. लॉकडाउन काळात सर्व उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही जबर फटका बसला. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत आणि डिजीटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांना रोजगाराच्या सोयी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू गेल्या काही वर्षांत स्वतःचं स्वप्न घेऊन स्टार्ट-अप यार केलेल्या लोकांनाही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. पण काही मंडळी यामुळे हार न मानता मिळेल त्या परिस्थितीत लढण्याचा पर्याय स्विकारत आहे. बीडच्या आष्टी गावातील सांगवी पाटण गावाचा रहिवासी असलेल्या दादासाहेब भगत या तरुणाने लॉकडाउन काळात आपल्या गावात संपूर्ण भारतीय बनावटीचं डिझायनिंग सॉफ्टवेअर बनवलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून दादासाहेब हे Do Graphics हे आपलं नवीन सॉफ्टवेअर बाजारात आणतो आहे. या निमीत्ताने लोकसत्ता ऑनलाईनने त्याच्याशी संवाद साधला.

१० वी पर्यंत गावात शिक्षण घेतलेल्या दादासाहेबने नंतर ITI चं शिक्षण घेतलं. यानंतर ११ वी साठी त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतू काही कारणास्तव तो कॉलेजचं शिक्षण पूर्ण करु शकला नाही. यानंतर पुण्यात येऊन दादासाहेबने Infosys कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे काम करत असताना दादासाहेबला Animation Industry बद्दल कळलं. Infosys मध्ये वर्षभर काम केल्यानंतर दादासाहेबने Animation, Motion Graphics चे ऑनलाईन धडे गिरवायला सुरुवात केली. कधी आपल्या मित्रांकडून तर कधी ऑनलाईन शिक्षण घेत दादासाहेबने पुण्यात स्वतःची कंपनी सुरु केली. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या दादासाहेबने अवघ्या काही महिन्यांत स्वतःच्या कंपनीचा जम बसवला. आपल्या हाताखाली काम करणारे सहकारी, पुण्यात कंपनी सुरु करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेचं महिन्याचं भाडं (४५ हजार रुपये) इतका खर्च करुनही दादासाहेब स्वतःसाठी चांगली कमाई करत होता. परंतू लॉकडाउन सुरु झालं आणि त्याचा फटका दादासाहेबलाही बसला.

virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”
Prajna pathshala mandal vai Higher Education in Kashi
तर्कतीर्थ विचार: काशीतील उच्चशिक्षण
Farmers climate smart friend Open source augmented reality headset
मुलाखतींच्या मुलाखत: शेतकऱ्यांचा ‘क्लायमेट स्मार्ट’ मित्र
Dadar-Ratnagiri Railway , Konkan , train to UP,
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!

“लॉकडाउन काळात जवळपास ७० टक्के धंदा कमी झाला होता. अशा परिस्थितीत पुण्यात राहण्यात काही अर्थ नव्हता हे मला समजलं आणि मी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी परतल्यानंतर आजुबाजूच्या परिसरात फ्रिलान्स काम करणारे, होतकरु आर्टीस्ट यांना एकत्र घेऊन भारतीय बनावटीचं ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य भारतीय लोकांना वापरता येईल असं सोपं ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवण्याची आमची कल्पना होती. अनेकांना डिझाईनिंगचा गंध नसतो असे लोकंही या ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वतःचं डिझाईन तयार करु शकतात. यासाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा ५ हजार टेम्प्लेट आम्ही यात देणार आहोत.” दादासाहेबने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना माहिती दिली.

शहर सोडून गावाकडे परतलेल्या दादासाहेबसमोर सेटअप तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. पुण्यात IT सेक्टरमध्ये काम केलेल्या दादासाहेबला Animation आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत मोकळ्या वातावरणाची किती गरज असते याची जाणीव होती. यासाठी दादासाहेबने गावातील एका मोकळ्या जागी असलेल्या गोठ्यात पत्र्याच्या शेडमध्ये सेटअप तयार करुन कामाला सुरुवात केली. सध्या दादासाहेब आणि त्याचे ७ सहकारी अस्सल गावरान सेटअपमध्ये आपलं काम करत आहेत. तर उर्वरित सहकारी हे Work From Home करत आहेत. नवीन सॉफ्टवेअर आणायचं म्हणजे त्यासाठी आर्थिक बाजूही तितकीच भक्कम हवी. सुदैवाने दादासाहेबच्या काही मित्रांनी त्याला मदत केली. तसेच इतर सहकाऱ्यांनीही गावात काम करत असताना फारसा खर्च होत नसल्यामुळे, सध्या आम्हाला खर्चापुरते पैसे दे असं सांगत नवीन सॉफ्टवेअर लॉन्च होईपर्यंत पूर्ण पगार घेण्यास नकार दिला. या सर्वांच्या अथक मेहनतीमधून आज हे सॉफ्टवेअर तयार होत असल्याचं दादासाहेबने सांगितलं.

आपल्या सहकाऱ्यांसाठी दादासाहेबने तंबू उभारुन गोठ्याजवळच राहण्याची सोय केली आहे.

 

सध्या प्राथमिक स्वरुपात असलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये पुढे अजून सुधारणा दादासाहेबला करायची आहे. भारतात डिझाईन इंडस्ट्रीमधलं ९० टक्के काम हे परदेशी सॉफ्टवेअरवर चालतं. हा वापर कमी करुन भारताला डिझाईन इंडस्ट्रीत आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न दादासाहेब बाळगून आहे. भविष्यात सॉफ्टवेअरसाठी लागणारे Stock Photo, Videos साठी हौशी फोटोग्राफर किंवा सोशल मीडियावर कंटेंट क्रिएट करणाऱ्या होतकरु तरुणांसोबत टायअप करायचा दादासाहेबचा विचार आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून दादासाहेब आपल्या सॉफ्टवेअरचं ऑनलाईन लॉन्च करणार आहे. गुगलवर doographics.com नावाने सर्वसामान्य युजर्सना हे सॉफ्टवेअर मिळणार आहे. बाजारात सॉफ्टवेअर आल्यानंतर दादासाहेब सुरुवातीला होतकरु लोकांना मोफत डिझाईन करुन देणार आहे. तसेच लोकांना या स्टार्टअपला मदत करायची असल्यास देणगी देण्याचा पर्यायही दादासाहेबने ठेवलाय. लॉकडाउनने भारतात अनेकांचं कंबरडं मोडलं. पण तरीही काही लोकं हार न मानता आपलं काम करत आहेत. दादासाहेबसारख्या होतकरु तरुणांच्या प्रयत्नातूनच उद्याच्या आत्मनिर्भर भारताचा पाया घातला जाईल यात काही शंकाच नाही.

Story img Loader