इंदापूरजवळील लाखेवाडी येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून २० ते २५ जणांच्या जमावाने दलित कुटुंबाच्या घरावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये दोन महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बावडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असताना तीन हल्लेखोरांनी या कुटुंबाचे स्वयंपाकाचे घर पेटवून दिले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी इंदापूर येथे पुणे-सोलापूर रस्ता अडवण्यात आला. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
इंदापूर ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखेवाडी येथील रस्त्याच्या जुन्या वादाच्या कारणावरून या कुटुंबावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.  या वेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. या कुटुंबाच्या सदस्यांना घराबाहेर काढूनही मारहाण करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा