जागतिक महिलादिनाच्या पूर्वरात्री एका गरीब दलित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिला मारहाण व दमदाटी करून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. करमाळा तालुक्यातील कंदर येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघा जणांविरूध्द पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्य़ासह नागरी संरक्षण हक्क कायदा व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दशरथ हिरू शिंदे व प्रमोद प्रकाश वागज अशी या गुन्ह्य़ातील आरोपींची नावे आहेत. सदर दलित महिलेच्या घरात रात्री अंधारात घुसून या दोघांनी तिला मारहाण केली. शिंदे याने तिच्यावर अत्याचार केले. नंतर पुन्हा तिला मारहाण व दमदाटी करण्यात आली. या गुन्ह्य़ात प्रमोद वागज याने शिंदे यास मदत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्य़ाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब बंडगर हे करीत आहेत.
करमाळ्याजवळ दलित महिलेवर अत्याचार; दोघांविरुध्द गुन्हा
जागतिक महिलादिनाच्या पूर्वरात्री एका गरीब दलित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिला मारहाण व दमदाटी करून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. करमाळा तालुक्यातील कंदर येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघा जणांविरूध्द पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्य़ासह नागरी संरक्षण हक्क कायदा व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
First published on: 10-03-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit woman molested