कराड : पशुधनाच्या चाऱ्यासाठी दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून दलित महिलेस अल्पवयीन मुलासह फरपटत आणत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पानवण गावात घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा >>> युवतीवर ट्रकच्या केबिनमध्ये सामूहिक बलात्कार, गुन्हा लपवण्यासाठी डोक्यावर टॉमीने वार करून खून

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

देवदास रोहिदास नरळे, पिंटू उर्फ शांताराम रोहिदास नरळे, संतोष गोपाळ शिंदे व जनाप्पा विठ्ठल शिंदे (सर्व. रा. पानवण) अशी कोठडी मिळालेल्या चौघांची नावे आहेत. या मारहाणीत संबंधित महिला जखमी झाली असल्याची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास दहिवडीच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आक्रमक होत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, याबाबतची निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. पोलिसांची माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार महिला व त्यांचा १७ वर्षीय मुलगा यांनी चाऱ्यासाठी आरोपींना पैसे दिले होते. मात्र त्यांनी चारा दिला नाही आणि पैसेही परत केले नाही. याबाबतच विचारणा केल्यावर देवदास नरळे याने या दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर देवदास नरळे, पिंटू उर्फ शांताराम नरळे, संतोष शिंदे व जनाप्पा शिंदे यांनी लाठय़ाकाठय़ा व लाथाबुक्क्याने या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. महिलेच्या अल्पवयीन मुलासही बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे अनेक ग्रामस्थ तिथे होते. याबाबत सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर देवदास नरळे व त्याचा भाऊ पिंटू उर्फ शांताराम नरळे या दोघांना अटक करण्यात आली. तर संतोष शिंदे व जनाप्पा शिंदे फरारी होते. त्यांनाही अटक करण्यात आली. या चौघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.