कर्जत : विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी कोपर्डी येथे घडली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्योगवाढीकडे वाटचाल, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाजवळच हरणवस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता. त्यास हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे तमाशात गोंधळ उडाला. काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. परंतु गोंधळामुळे तमाशा बंद पडला. त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करत मारहाण झाली. त्याचा मोबाइलही काढून घेतला. सकाळी त्याने घरी निरोप पाठवला. त्याचे नातलग कपडे घेऊन आले व त्याला घरी नेले. गुरुवारी दुपारी नितीनने घरातच आत्महत्या केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नितीन शिंदे याच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत गावातील काही जणांची नावे लिहिली आहेत. त्याआधारे गुन्हा दाखल केला जाईल. – राकेश ओला, पोलीस अधीक्षक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit youth commits suicide after stripping and beating in kopardi zws
Show comments