रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुतीमंदिर येथे असलेल्या शिवसृष्टीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील मारुतीमंदिर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीतील काही मावळ्यांची विटंबना झाल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच याची तत्काळ दखल घेवून शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मावळ्यांची विटंबना करणाऱ्या आरोपीला तत्काळ पकडून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा – Sujay Vikhe-Patil : “…तर तुमची गाठ माझ्याशी आहे”, माजी खासदार सुजय विखेंचा इशारा कोणाला?

हेही वाचा – धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, विजय खेडेकर, अभिजीत दुडे, प्रशांत सुर्वे, दिपक पवार यांनी पोलिसात निवेदन दिले आहे. दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुतळ्याची विटंबना ही दारुच्या नशेत केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संतापजनक प्रकाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Story img Loader