ऊर्जा क्षेत्रात २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा महाघोटाळा झाला असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार करून त्यासंबंधी उद्या मुंबईत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत गैरप्रकार करणाऱ्यांना काँग्रेस पाठिशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
अकारण कोळसा आयात, कोळशाची बाजारात विक्री, दुय्यम दर्जा कोळसा खरेदी, नवीन वीज प्रकल्पांची उभारणी, वीज खरेदी आदी विविध रूपांनी राज्यात तीन वर्षांत वीज क्षेत्रात २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा महाघोटाळा झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करून यासंबंधी उद्या मुंबईत आणखी माहिती देणार असून त्यासंबंधी पुरावाही सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेत झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्यास राज्यातील सहकार खाते पर्यायाने काँग्रेस सरकार पाठिशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘ऊर्जा क्षेत्रातील महाघोटाळ्याचा आज गौप्यस्फोट’
ऊर्जा क्षेत्रात २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा महाघोटाळा झाला असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार करून त्यासंबंधी उद्या मुंबईत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-02-2014 at 02:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damania to expose power scam today