Gautami Patil : नृत्यांगाना गौतमी पाटीलला ( Gautami Patil ) जामीन मंजूर करण्यात आला आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने गौतमीला जामीन मंजूर केला आहे. विनापरवाना कार्यक्रम करुन नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने अटी आणि शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

मागच्या वर्षी गौतमी पाटीलचा ( Gautami Patil ) कार्यक्रम पाईपलाईन रोडवर पार पडला होता. या कार्यक्रमासाठी तिने संमती घेतली नव्हती. या प्रकरणावरुन गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. मागील वर्षी गणपती उत्सवा दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला होता. यानंतर गौतमी पाटील ( Gautami Patil ), तिचे मॅनेजर आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हे पण वाचा- लोककलावंत गणेश चंदनशिवेंची खंत, “लावणी गौतमी पाटीलमुळे भ्रष्ट झाली, नखशिखांत शृंगाराने…”

गौतमी पाटील न्यायालयात हजर झाल्यानंतर जामीन

गौतमी पाटील ( Gautami Patil ) अहमदनगर येथील न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर तिला अटी शर्थींसह जामीन मंजूर केला. गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही गौतमीचा कार्यक्रम झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gautami Patil News
गौतमी पाटीलला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य-गौतमी पाटील, फेसबुक पेज)

काय आहे प्रकरण?

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम १८८,२८३,३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २,१५ आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५, ६ आणि मु.पो.का.क ३७ (१) (२)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे.

Story img Loader