आपल्या लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलची तरुणाईत प्रचंड क्रेझ आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असं तिला म्हटलं जातं. याच गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.स्वराज्य फाऊंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र यावेळी दुर्गेश चव्हाण यांना दाखल केलेला व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हते, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मेसेज व्हायरल केल्यानंतर आणि दाखल केलेल्या त्या व्यक्तीकडील आधार कार्डच्या त्यांची ओळख पटली.
दुर्गैश चव्हाण हे बेवारस व्यक्तींना मदत करण्याचं काम करतात
स्वराज्य फाऊंडेशन दुर्गेश चव्हाण हे त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून बेवारस व्यक्तींना आधार देण्याचे काम करतात. चव्हाण यांनी गुरुवारी सुरत बायपास हायवे येथून त्यांनी गौतमी पाटील यांच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यानंतर त्यांच्या खिशातील आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रविंद्र बाबुराव पाटील रा. वेळोदे ता. चोपडा असल्याचे कळले. व्यक्तीशी संबंधितांनी संपर्क साधावा यासाठी चव्हाण यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले. त्यानंतर रविंद्र यांच्याबद्दलची माहिती समोर आली आणि ते गौतमी पाटीलचे वडील आहेत ही बाब समजली.
हे पण वाचा- गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल? गौतमीने मिठी मारताच फॅन्स म्हणतात, “बापा शिवाय..”
रविंद्र पाटील यांची भावजय शोभा आनंद नेरपगार ( पाटील ) या त्यांच्या मुलीसह हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोहचल्या. रविंद्र पाटील हे प्रसिध्द नृत्यांगना, लावणी नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभा नेरपगार यांनी दुजोरा दिला आहे. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी ह्या दोघी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मला त्याबद्दल जास्त माहित नसल्याचे देखील शोभा नेरपगार यांनी सांगितलं. बेवारस म्हणून दाखल केलेले रविंद्र पाटील यांची मुलगी गौतमी पाटील असल्याची माहिती खुद्द दुर्गेश चव्हाण यांनाही नव्हती. परंतु सोशल मिडियावर मेसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना शंभराहून अधिक फोन रविंद्र पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे आले. असल्याची माहिती दुर्गेश चव्हाण यांनी यावेळी दिली.
रविंद्र पाटील यांची ओळख कशी पटली?
रविंद्र पाटील हे त्यांच्या पत्नीपासून आणि मुलीपासून मागच्या पंधरा वर्षांपासून विभक्त झाले. गौतमी पाटील शिंदखेड्यात मामांकडे वाढली. आठवीपर्यंतच्या शिक्षणानंतर तिने पुणे गाठलं. तेव्हापासून तिचा नृत्याचा प्रवास सुरु झाला. गौतमी पाटीलची मावशी धुळ्यात आली आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं तसंच गौतमीशी काही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.