शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतच्या मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”
उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभा असेल असा शाब्दिक टोला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी यापूर्वीच व्यक्त होता. बुधवारच्या सभेनंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया देताना माजी नजरसेवक संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक असणाऱ्या देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उणीधुणी काढल्याचा शाब्दिक चिमटा देशपांडेंनी काढला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा