Dasara Melava 2022 Latest News: शिवसेनेतील दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.उद् बीकेसीमधील दसरा मेळाव्यात हा पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. मात्र त्यांची नावं उघड करण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले कृपाल तुमाने –
कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की “मी गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावं यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळालं आहे”.
“राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
“जे आमदार, खासदार प्रवेश करणार आहेत त्यांची नावं संध्याकाळीच सर्वांना कळतील. मुंबई, मराठवाडा कुठलेही ते असू शकतात. प्रभावी खासदार आमच्याकडे आलेले दिसतील. ज्या आमदारांना, खासदारांना आमचे विचार पटत आहेत, ते आमच्याशी संपर्क साधत सोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. जे येतील त्यांना सोबत घेऊ,” असं त्यांनी सांगितलं.
मनिषा कायंदे यांनी दिलं उत्तर –
“एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सूरतला, गुवाहाटीला गेले, तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी आमदारांना डांबून ठेवण्याची, हॉटेलमध्ये बंदिस्त करण्याची भूमिका घेतलेली नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं आणि सोबत राहायचं आहे त्यांनी स्वेच्छेने राहावं ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही. आमच्याकडेही तशी यंत्रणा कामाला लावली असती, तर आमदार राहिले असते. पण हे सगळं त्यांना करायचं नव्हतं. कोणालाही जबरदस्ती सोबत ठेवणं त्यांना पटलेलं नाही,” असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या “आजपर्यंत अनेक आमदार, खासदार गेले आहेत. पण शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. अनेक ज्य़ेष्ठ शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. दोन्ही ठिकाणी प्रवेश सुरु आहेत. जे येतील त्यांचं स्वागत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला दिलेली निशाणी गोठवण्याचा यांचा प्रयत्न असून, हेच विचार ते पसरवणार आहेत का?”.
“पक्षाचं काही नुकसान झालं तरी, नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. दुसरी, तिसरी, चौथी फळी तयार होत आहेय. उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने लोक येत आहेत. ते आमदार, खासदार नसतील, पण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंचे विचार पटत आहेत,” असंही मनिषा कायंदे यांनी सांगितलं.
“हे आमदार, खासदार कोण आहेत हे त्यांनाच माहिती असेल. त्यांचा हा दावा फोलही ठरु शकतो. पण जरी खरं असेल तरी उद्धव ठाकरेंवर परिणाम होणार नाही. ते फिनिक्स पक्षाप्रममाणे भरारी घेतील. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हा अस्वस्थता वाढवण्याचा प्रयत्न आहे. लोकांमध्ये एक चित्र निर्माण करत आहेत,” असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला आहे.