Manoj Jarange Patil Dasara Melava 2024: मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केलं. मात्र, अद्याप राज्य सरकारने त्यांच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आता श्री क्षेत्र नारायण गड बीड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या दसऱ्या मेळाव्याला लाखो मराठा बांधव नारायण गडावर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात होता. यातच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत सूचक विधान केलं होतं. यानंतर आता दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत.”आचारसंहिता लागेपर्यंत थांबा, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा