केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान गडकरींनी विविध राष्ट्रीय महामार्गांच लोकार्पण केलं. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भर सभेत नितीन गडकरींना काही वर्षांपूर्वीच्या कढी भाताची आठवण करून दिली. यावेळी नितीन गडकरी यांनीही हसून या आठवणीला प्रतिसाद दिला.

भरणे हे भाषण देताना पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरचा किस्सा सांगत होते. “गडकरींना भेटायला मी आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बंगल्यावर गेलो. गडकरींना भेटायला गेलो तेव्हा सीआरएफअंतर्गत असणारी योजना संपलेली होती. गडकरींना मी इंदापूरची आणि अजित पवारांनी बारामतीची पत्र दिली. त्यावेळेस मी नवीन आमदार असल्याने कदाचित पण गडकरी साहेब तुम्ही दादांना (अजित पवारांना) सांगितलं की बारामतीचं राहू द्या पहिलं मला इंदापूरचं (काम हाती) घ्यायचंय. त्यानंतर गडकरींनी इंदापूरमधील रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले,” असं भरणे यांनी आठवण सांगताना म्हटलं.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”

पुढे बोलताना, “तुम्ही रस्त्यासाठी निधी मंजूर केला वगैरे सोडून द्या पण साधारण बारा साडेबाराची वेळ होती. अजित पवार तिथून निघून गेले. मात्र मला तुम्ही सांगितलं की, असा जाऊ नकोस तू जेवण केलेलं नाही. तू माझ्याकडे कढी भात खाऊन जा असं सांगितलं. त्यामुळे मी २०१४ साली तुमच्याकडे कढीभात खाललाय तो अजूनही माझ्या पूर्ण स्मरणामध्ये आहे,” असंही भरणे यांनी सांगितलं. हे ऐकताच गडकरी हसू लागले.

“काम करणारी आणि प्रेम जिव्हाळा लावणाऱ्या माणसांपैकी तुम्ही आहात. महाराष्ट्राच्या राजकारणात आज दोन माणसं खूप वेगळी आहेत. राजकारण सोडून समाजाला कसं एकत्रित करता येईल यासाठी प्रयत्न करणारी दोन माणसं म्हणजे शरद पवार आणि नितीन गडकरी. तुम्ही आणि शरद पवार रोज तुम्हाला माणसं भेटल्यानंतर ती जोडण्याचं काम करता. तुम्हाला सवय आहे की तुमच्याकडे अगदी कोणताही साधा कार्यकर्ता आला तरी त्याची विचारपूस करणं, त्याला काय काम आहे, ते काम कसं मार्गी लागेल. त्या माणसाला कशी मदत करेल यासाठी तुमची धडपड आम्ही पाहिलीय,” असं भरणे म्हणाले.