चेन्नई येथील एका साईभक्त महिलेने आपल्या दिवंगत सासूच्या इच्छापूर्तीसाठी साईचरणी गुरुवारी सायंकाळी ४० लाख रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये साईबाबा रुग्णालयासाठी १४ लाखांच्या व्हेंटीलेटर मशिनचा समावेश आहे. अन्य २६ लाख रूपये विविध निधीत जमा करण्यात आले आहे.
सरलादेवी असे या देणगीदार महिलेचे नाव आहे. त्यांच्या सासू लीलावतीदेवी या साईभक्त होत्या. आपले घर विकून जे पैसे येतील ते साईबाबांना द्यायची त्यांची इच्छा होती. त्यांच्या देहावसानानंतर सून सरलादेवी यांनी हे घर विकून आलेले ४० लाख रूपये गुरुवारी सायंकाळी साईंच्या चरणी अर्पण केले. अभिषेक, नैवद्य, कोठी, उत्सव व साईसत्यव्रत या निधीत प्रत्येकी ४ लाख रुपये, तर प्रसादालयातील दोन दिवसांच्या  मोफत अन्नदान निधीसाठी ६ लाख रुपये सरला देवी यांनी दिले.
या देणगीमुळे आपले दिवंगत सासूबाईंची इच्छापूर्ती झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थानला १०० कोटींची देणगी देणाऱ्या के.व्ही.रमणी यांनी देणगीसाठी या कुटुंबाला मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा