अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि ‘अनाथांची माय’ या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचं आवाहन ममता यांनी केलं आहे.

नक्की पाहा – Photos: हुंदके, सांत्वन, डोळ्यात पाणी अन् नजर जाईल तिथपर्यंत रांग; सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

हडपसर येथील मांजरी परिसरात असलेल्या सन्मती बाल निकेतन संस्थेत माईंचं पार्थिव आणण्यात आल होतं. या ठिकाणी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ठोसरपागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ममता या तिथे उपस्थित होत्या. अंत्यसंस्कारासाठी आणि सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter of sindhutai sapkal tested positive for covid 19 vsk
Show comments