लोकसभा निवडणुकीतनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. तरीही आघाडी आणि युती दोहोंनी विजयाचा दावा केला आहे. अशात जागावाटपाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना विचारला असता त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

जनसन्मान यात्रेबाबत काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांची ( Ajit Pawar ) नाशिमधून आज जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसमान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहि‍णींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत”, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

हे पण वाचा- अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील गुलाबी वातावरण, वाहनेही गुलाबी

मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले अजित पवार?

मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटते आहे ते ती भूमिका मांडत आहे. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. काही निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही. काही निर्णय हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळाले पाहिजे. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी दिली.

What Ajit Pawar Said?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

जागावाटपाबाबत काय म्हणाले अजित पवार?

महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader