Ajit Pawar On Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी अटक केलं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणांकडून सुरु आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचाही सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती.

तसेच काही कागदपत्रही त्यांनी अजित पवार यांना दिली होती. यानंतर अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली? याविषयीची माहिती अजित पवार यांनी सांगितली. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस नाही तर अजित पवार निर्णय घेतील असं म्हटलं होतं. यावरून अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, असं म्हणत खोचक टीका केली आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Saif Ali Khan Case
Saif Ali Khan Case : “भक्कम पुरावे…”, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी माहिती; आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबतही केला खुलासा
Stampede breaks out at Maha Kumbh on Mauni Amavasya
Stampede Breaks Out at Maha Kumbh : “महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झालीच नाही, फक्त भाविकांची…”, पोलिसांनी केलं स्पष्ट!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…

अजित पवार काय म्हणाले?

“अंजली दमानिया यांनी मला काल काही कागदपत्र दिले. ते कागदपत्र मी पाहिले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी चर्चा केली. यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अंजली दमानिया भेटल्या, तसं त्यांनी माझीही भेट घेतली. अंजली दमानिया यांनी फडणवीसांनाही काही कागदपत्र दिले आहेत. मी फडणवीस यांना विचारलं की तुम्ही काय केलं? तर ते म्हणाले बीडच्या घटनेत जी काही चौकशी सुरु आहे. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी. आता कोणी काही पुरावे दिले तर त्याचीही शाहनिशा केली पाहिजे, शाहनिशा केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात ते पाहून नंतर ठरवलं जाईल”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, माझ्या राजीनाम्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच उत्तर देतील, याबाबत अजित पवार यांना विचारलं असता अजित पवार म्हणाले, “आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत आहोत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावची जी काही घटना घडली, त्या घटनेच्या चौकशीत जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने चौकशी सुरु आहे, या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर आली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, कोणाचा संबंध येत नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. पण जर संबंध असेल तर निश्चित कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

‘सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी देणंघेणं नाही’

सुरेश धस यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा, याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “सुरेश धस यांना काय वाटतं? त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर आहे. त्यामुळे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं त्यासाठी आम्ही प्रमुख निर्णय घेत असतो. मात्र, असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. भाजपाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्हाला अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस हे सांगतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“धनंजय मुंडे यांच्यावर नेतेमंडळी खापर फोडत नाहीत तर खालचे कार्यकर्ते फोडत आहेत. नेते मंडळींशी मी संपर्कात आहे. मात्र, तुम्ही कोणाला नेते समजता मला माहिती नाही. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दुष्टीने पक्षाचे नेते नाहीत”, असं म्हणत अजित पवार यांनी सुरेश धस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. सरकारमध्ये नैतिकता नाही, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही”, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं.

Story img Loader