उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी ( २३ सप्टेंबर ) बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच, बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली आहे. यानंतर एक कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“बारामतीत ४२ कोटी रूपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला ५ कोटी रूपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना ५ कोटी दिले,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली.

हेही वाचा : “२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेते म्हणाले…

“उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात बघायचं कुठल्या, कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचं नाव नसेल, तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला ४२ कोटी रूपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं,” असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला.

हेही वाचा : शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या…

“टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चूका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत,” असा सज्जड दमही अजित पवार यांनी भरला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar on finance ministry in baramati ssa
Show comments