Ajit Pawar On Badlapur Case : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एक घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दोन चिमुरड्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. तसेच राज्यभरातून संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. यानंतर या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप करत महायुती सरकारमधील नेते पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यात कसे अपयशी ठरत आहेत? महिलांना सुरुक्षित ठेवण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल करत सरकारला घेरलं.

दरम्यान, बदलापूर घटनेबाबत बोलताना आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता अधिकाऱ्यांनाही कडक इशारा दिला आहे. “शाळा असो किंवा रुग्णालये. कुठेही कोणतीही हयगय होणार नाही. जर यामध्ये कोणतीही हयगय झाली तर संबंधित अधिकाऱ्यांनाही जेलमध्ये चक्की पिसींग करायला लावणार, त्यांनाही सोडणार नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कर्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
ias officer puja khedkar files harassment complaint
Puja Khedkar : ‘मला अपात्र ठरविण्याचा UPSC ला अधिकार नाही’, फसवणूक प्रकरणावर पूजा खेडकर काय म्हणाल्या?
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Ajit Pawar On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Ajit Pawar : “राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो”, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Narayan Rane Malvan Statue collapse
Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”
Amol mitkari jaydeep apte
Amol Mitkari : “सर्व ठरवून केलंय का?” कोसळलेल्या पुतळ्याबाबत अमोल मिटकरींचा प्रश्न; नेमका आरोप काय?
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

हेही वाचा : Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”

अजित पवार काय म्हणाले?

“बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. महिलांवर, मुलींवर अन्याय आणि अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा हा गंभीर गुन्हा आहे. त्याला माफी नाही. दोषी कोणीही असो मग त्याला सोडलं जाणार नाही. सरकारं येतील किंवा सरकारं जातील. मात्र, महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. मी तर सांगितलं की अशा प्रवृत्तींना थेट फासावर लटकवा.”

“आता भारतीय न्याय संहितेमधील तरतुदीमध्ये आता महिलांना घरूनही तक्रार करता येणार आहे. तसेच नवीन कायद्यामध्ये अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत दोषींना फाशी आणि जन्मठेपेची तरतुद केलेली आहे. आरोपीला त्याच्या पुढच्या ५० पिढ्या आठवल्या पाहिजेत. अशा नराधमांना माफी नाही. आता आपण यामध्ये ई-एफआयआर ही सुविधाही सुरु केली आहे. अनेकदा महिला गुन्हा दाखल करण्यासाठी कसं जायचं? म्हणून घाबरतात. पण आता ई-एफआयआर सुविधा राबवण्यात येणार आहे. शाळा असो किंवा रुग्णालये असो, कुठेही कोणतीही हयगय होणार नाही. जर यामध्ये कोणतीही हयगय झाली तर संबंधित अधिकाऱ्यांनाही जेलमध्ये चक्की पिसींग करायला लावणार. त्यांनाही सोडणार नाही”, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.