Ajit Pawar On Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील निर्मल नगर परिसरात घडली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती सांगितली जात आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर करत गोळीबार केला. यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप

हेही वाचा : Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब, एक मोठं षडयंत्र…”, किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

अजित पवार यांनी काय म्हटलं?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?

“बाबा सिद्दीकींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातला एक आरोपी हरियाणाचा आहे. तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. कुणीही आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.

बाबा सिद्दीकींवर तिघांकडून गोळीबार

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यांवर तीन जणांनी गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर विरोधी पक्षाकडून गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहितीही सांगण्यात आली आहे.

Story img Loader