विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडत आहे. एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते. यावेळी पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याबाबत आमदारांना मार्गदर्शनही करण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. हे मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत विधानभवन परिसरात सुरु असणार आहे. त्यानंतर ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. विधानपरिषदेत गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने आपले उमेदवार विजयी होतील असा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीने आपलेच सर्व उमेदवार विजयी होतील असं म्हटलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार अधिवेशनाच्या दरम्यान जयंत पाटील यांना चेंबरमध्ये भेटतात. त्यामुळे काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही फक्त एकमेकांचे विरोधक झालो आहोत. ही वस्तुस्थिती आहे”, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
Mahayuti Bhandara, Narendra Bhondekar,
भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण
bjp leader dilip bhoir
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत

हेही वाचा : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…”, रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

अजित पवार काय म्हणाले?

“आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या आहेत. काही गोष्टी घडतात. त्यात नवीन काही नाही. आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. तसेच अधिवेशनाचाही शेवटचा दिवस आहे. आम्ही आमचे आमदार आणि आमचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार असे आम्ही सर्व एकत्र असून आमचे दोन्हीही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले, “अशा चर्चा कशाला कोण करेल? खरं सांगू का? आजकाल लोकांना बोलायला काही विषय नाही. त्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना गैरसमज निर्माण करायचा. पण असं काहीही नाही. ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.

भुजबळ बैठकीला गैरहजर का?

छगन भुजबळ हे काल राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर नव्हते, अशी चर्चा आहे. यावर अजित पवार म्हणाले, “सभागृहात काल कॅबिनेटची बैठक होती. त्यामुळे त्या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक प्रतिनिधी तेथे असावे. त्यामुळे छगन भुजबळ यांना त्या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं”, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि जयंत पाटील हे अधिवेशनाच्या दरम्यान चेंबरमध्ये भेटतात. त्यामुळे तुमचे काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मला माझ्या आमदारांवर भरोवसा आणि विश्वास आहे. त्यामुळे या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही पूर्वी एकत्र असताना उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसायचो. आजही त्या ठिकाणी सर्वजण एकत्र जेवणासाठी बसतात. तेथे जयंत पाटील हे देखील येतात. आज जयंत पाटील मला भेटले तर आम्ही एकमेकांना नमस्कार करतोच. शेवटी महाराष्ट्राची ती पंरपरा आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही फक्त एकमेकांचे विरोधक झालो आहोत. ही वस्तुस्थिती आहे”, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.