Ajit Pawar महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच आहे, त्यानंतर ही योजना बंद केली जाईल असा आरोप विरोधक करत आहेत. तर अजित पवार यांनी विरोधकांना उद्देशून पोस्ट केली आहे. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी खासियत आहे असं अजित पवार ( Ajit Pawar )यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ..’ योजना अशा प्रकारच्या योजना आणण्यापेक्षा सरकारने थेट माझा लाडका मतदार योजना जाहीर करून टाकवी असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशी योजना जाहीर केल्यास थेट सगळ्यांना पैसे वाटण्याचा मार्ग मोकळा होईल. बाकी दुसरी काही भानगडच नको, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. तर संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. मात्र विरोधकांना अजित पवारांनी ( Ajit Pawar ) आता पोस्ट करुन उत्तर दिलं आहे.

ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?, अजित पवार म्हणाले, “आमचं नातं..”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

अजित पवारांची पोस्ट काय? (What Ajit Pawar Said? )

‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे. अशी पोस्ट अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा- Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: योजनेबाबत संभ्रम, आदिती तटकरेंनी महिलांना दिलं ‘हे’ आश्वासन

लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रं आवश्यक?

आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र