मी आजपर्यंत काहीही मागितलेलं नाही. मी आता फक्त तुम्हाला मतं मागतो आहे. मी खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याच्यासाठी मतं मागणार असं आवाहन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीत केलं. मी इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका असंही अझित पवार म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका..

मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वच्छता ठेवा, झाडांची फुलं तोडू नका, पचापच थुंकू नका. बारामतीला देशात पहिल्या क्रमांकांचं बक्षीस मिळालं पाहिजे. बारामतीत आपण पक्षाचे पैसे घालून कामं केली आहेत. एकीकडे अजित तुम्हाला सांगतो आहे एकीकडे वरिष्ठ सांगतो आहे कुणाचं ऐकायचं? इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐका. उद्या माझ्या विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान मोदींनी सांगेन की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे. आपली कामं झाली पाहिजेच या दृष्टीने अडी-अडचणीला कोण मदत करतो याचा विचार करा. असं अजित पवार म्हणाले आहे.

लोकसभेला मला पावती द्यायची असेल तर

माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे. त्या निवडणुकीत तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर बारामतीत जो बदल आणि जे काही काम चाललं आहे जे निर्णय मी विकासासाठी घेतले ते लक्षात ठेवा. धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात. उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन तिथे मी उभा आहे (अजित पवार) असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील.. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे. असं अजित पवार म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “कमी वयात सोडून गेली”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटपासून अजित पवार अनभिज्ञ, भर सभेत व्यक्त केलं दु:ख

मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे आपल्या कामांचा वेग असाच राहण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन सहकार्य करावं. आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करा. तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील, नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. असंही अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.

आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीत आर्थिक सुबत्ता कशी नांदेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसाठी आम्ही सगळेचजण जिवाचं रान करुन काम करता आहेत. असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांची सुद्धा कानउघडणी केली. अजूनही काही जण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावे घेत नाहीत, पण तुमच्या गटा तटामुळे मला त्रास होतो. गट तट मला मान्य नाही. मी एकटा फिरेन, लोकं द्यायचे तेवढे मते देतील, असे म्हणत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला कानउघडणी केली. कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो, उंबराचे झाड आले की काही जण दत्त जयंती करतात. पण पक्षाने फळ खाल्ले की त्याच्या विष्ठेतून नवीन झाड येते. सगळ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. परवा गंगावेसला गेलो तिथेही मला काम करायचं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar speech in baramati emotional appeal to baramati people scj