जालन्यात शनिवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. जालन्यातल्या अंतर्वली गावात ही घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. या सगळ्या नंतर शरद पवार, उदयनराजे, उद्धव ठाकरे यांनी जालना दौरा केला. उदयनराजे हे सरकारच्या वतीने तिथे गेले होते. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी टीका केली. ज्या टीकेला देवेंद्र फडणवीस आज उत्तर दिलं आहे. त्यासाठी फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दोन सवाल केले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जालन्यातल्या घटनेचं राजकारण होणं हे योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तो पण प्रयत्न केला. ही बाब दुर्दैवी आहे. विशेषतः लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, वरुन आले अशा प्रकारचं मत तयार करण्याचे प्रयत्न झाले. सगळ्या नेत्यांना हे माहित आहे की लाठीचार्जचे निर्णय देण्याचे अधिकार एस.पी. आणि डी. वाय. एसपी यांच्या पातळीवर असतात. त्यासाठी कुणालाही विचारावं लागत नाही.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हे पण वाचा- “जालन्यात जी लाठीचार्जची घटना घडली त्याबद्दल मी क्षमा..”, देवेंद्र फडणवीस यांची बैठकीनंतर पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांना गोवारी हत्याकांडावरुन सवाल

यानंतर फडणवीस म्हणाले, आता माझा सवाल हा आहे की निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा त्याचा आदेश कुणी दिला होता? तो आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळला गोळीबारात शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याचं प्रकरण झालं होतं तेव्हा ते आदेश तेव्हा मुख्यमंत्री असलेल्यांनी दिले होते का? जालन्यातली घटना चुकीचीच आहे पण सरकार हे करतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे त्यातून लोकांनाही कळतं आहे की हे राजकारण चाललं आहे.

हे पण वाचा “मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना बोलण्याचा अधिकार तरी आहे का?” भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सवाल, म्हणाले…

उद्धव ठाकरेंना सवाल

उद्धव ठाकरे हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा, मराठा समाजाला आरक्षण द्या. मग मला त्यांना विचारायचं आहे की ५ मे २०२१ पासून एक वर्ष, एक महिना तुम्ही मुख्यमंत्री होतात तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाहीत? निव्वळ राजकारण करायचं हा सगळा उद्योग आहे. उद्धव ठाकरे जालन्याला गेले होते तेव्हा राजेश टोपेंना काय सर्कस करावी लागली ते सगळ्यांना माहित आहे त्यावर मी बोलणार नाही. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच लाठीचार्जची जी घटना घडली त्यावर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.