श्रीरामपूर येथील एक तरुण मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुलीशी लग्न केल्याने त्याचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसही त्याचा शोध घेत असून, अद्यापही तो सापडला नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर पोलीस आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होते. त्यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नितेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाही आहेत. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीये, हे संबंधितांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदू आहेत. तर, उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं,” असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी दिला आहे.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून, त्यांना..”; बीड प्रकरणावरुन संजय राऊत यांचा आरोप काय?

“हिंदू मुलावर वाकड्या नजरेने बघेल…”

“मी श्रीरामपूरला येतोय कळल्यावर तो पोलीस निरीक्षक सुट्टीवर गेला आहे. एक दिवस सुट्टीवर गेला आहे, वर्षाचे ३६५ दिवस नितेश राणेशी बोलावं लागेल ना. मग कुठे जाणार. आम्ही सर्वच पोलीस अधिकाऱ्यावर बोट उचलत नाही आहे. हिंदू धर्माला ताकद देणारे असंख्य अधिकारी आहेत. तीन चार दिवस झाले त्या मुलाची अवस्था कळत नाही. आरोपींना अटक झाली आहे, पण मुलाचा पत्ता नाही आहे. जोपर्यंत मुलगा सापडत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आहे. महाराष्ट्रात हिंदूत्ववादी सरकार आहे, हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांने लक्षात ठेवावं. कोणताही अधिकारी हिंदू मुलावर वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे, जाग्यावर राहणार नाही,” असा धमकीवजा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.

Story img Loader