Devendra Fadnavis On Harshvardhan Patil : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक बड्या नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा नेते मंडळी घेत आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यातच भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या चर्चा हर्षवर्धन पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.

असं असलं तरी हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत काही राजकीय चर्चा झाली? हर्षवर्धन पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या मार्गावर आहेत का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात. मात्र, हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील असा विश्वास आहे”, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांवर हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान; म्हणाले, “महायुतीमधील एक पक्ष…”
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Former Indapur MLA Harshvardhan Patil is rumored to be going to NCP Sharad Chandra Pawar party pune
हर्षवर्धन पाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश कठीण? इंदापूरमध्ये इच्छुकांची संख्या जास्त
sharad pawar babanra shinde ajit pawar
Babanrao Shinde : शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या आमदाराची निवडणुकीतून माघार? माढ्यात काय शिजतंय?
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
Sanjay Raut On Sharad Pawar VS Ajit Pawar
Sanjay Raut : “शरद पवार हे अजित पवारांना सोडून बाकीच्या सर्वांना पुन्हा…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

हेही वाचा : Harshvardhan Patil : देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा धक्का? निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ भाजपा नेता तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“कोण कोणाची भेट घेत आहे, हे महत्वाचं नाही. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यात अनेकांनी प्रेवश केला. त्याआधीच्या आठवड्यातही अनेकांनी पक्षप्रवेश केला. यापुढेही भारतीय जनता पक्षात खूप प्रवेश होतील. हे खरं आहे की निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात. मात्र, मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते असतील ते आमच्याबरोबरच राहतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा का?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मात्र, महायुतीमध्ये इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण येथे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळणार नसल्याची शक्यता असल्याने हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.