लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. विविध ठिकाणी सभा, मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. आज सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सभेत संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी काय केले?, अशी टीका शरद पवारांनी अनेकदा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं, अशी खोचक टीका त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी आहेत. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे. विरोधकांकडे काय अवस्था आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !

हेही वाचा : ‘एमआयएम’ अन् वंचितची ऑफर आहे का? काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या राजीनाम्यानंतर नसीम खान यांनी स्पष्ट केली भूमिका

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव टाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे य़ा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नारगरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्यांनी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळतं. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं. मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.