‘लव्ह जिहाद’ची प्रकरणं रोखण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच एक समिती स्थापन केली आहे. ही समिती घरापासून दुरावलेल्या आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींची माहिती घेणार आहे. ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा पारित करण्यापूर्वी सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हा कायदा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्याऱ्या जोडप्यासांठी अडचणीचा ठरू शकतो, याबाबत चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे, असं विधान फडणवीसांनी केलं आहे. तसेच आम्ही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊ इच्छित आहोत, असंही फडणवीस म्हणाले. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

‘लव्ह जिहाद’प्रकरणी स्थापित केलेल्या समितीबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, “संबंधित समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, ही समिती आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे. आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊ इच्छित आहोत. त्यासाठी आमची वेगळी समिती आहे. तसेच आम्ही आंतरधर्मीय विवाहाच्याही विरोधात नाहीत. पण अलीकडे अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामध्ये आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर सहा ते आठ महिन्यात मुलगी घरी परत येते. तिची फसवणूक होते. असं एखादं-दुसरं प्रकरण घडलं असतं तर ठीक आहे. प्रत्येक जातीत किंवा धर्मात असं घडत असतं. पण काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकरणांचा आकडा धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे तेथील धार्मिक एकोपाही कमी झाला आहे.”

हेही वाचा- विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभेत तुफान राडा; सदस्यांची एकमेकांना मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

“चार-पाच वर्षांपूर्वी तुम्ही मला विचारलं असतं तर ‘लव्ह जिहाद’ वगैरे अशा काही गोष्टी अस्तित्वात नाहीत, असं मी म्हटलं असतं. पण आता ज्याप्रकारे घटना समोर येत आहेत, ते पाहता सरकारने काही ना काही हस्तक्षेप करणं गरजेचं ठरत आहे. गावागावांत समाज एकमेकांसमोर येऊन हाणामाऱ्या केल्या जात आहेत, अशा स्थितीत सरकार शांत बसू शकत नाही. सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. केवळ आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आधुनिक विचारांचे आहोत, असं म्हणून चालणार नाही, सत्य स्वीकारावं लागेल.

हेही वाचा- मोर्चात गर्दी जमवण्यासाठी ‘मविआ’ने पैसे वाटले? भाजपा नेत्याने थेट VIDEO केला शेअर

“कुठल्या तरी धर्माच्या लोकांना थांबवण्यासाठी किंवा दोन धर्मात लग्नच होऊ नयेत, म्हणून आम्ही ही समिती तयार केली नाही. दोन धर्मात सहमतीने लग्न होत असेल तर आम्हाला काहीही अडचण नाही. पण त्यामागे काहीतर कट शिजताना दिसत असेल तर तो थांबला पाहिजे, यासाठी ही समिती स्थापन केली आहे. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई व्हावी, यासाठी ही समिती आहे. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणं थांबवायची कशी? हा प्रश्न माझ्यासमोरही आहे. त्यामुळे बाकीच्या भाजपाशासित राज्यांनी काय निर्णय घेतले? आणि त्याचा काय परिणाम झाला? याचा अभ्यास करूनच आम्ही निर्णय घेऊ,” असंही फडणवीस म्हणाले.

Story img Loader