जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अन्य ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच, मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

“ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे निर्णय सरकार घेणार नाही. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
minister gulabrao patil Devendra Fadnavis Aditya Thackeray jalgaon
देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा

मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढताना दिसत आहे, याबद्दल प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे राहतात, अशी परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही. सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट घोषणा केली आहे.”

हेही वाचा : राजेश टोपे अन् रोहित पवारांचा उल्लेख करत भुजबळांनी केला ‘तो’ आरोप, जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

“ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे निर्णय राज्य सरकार घेणार नाही. महाराष्ट्रात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करूयात,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : “तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…

‘रूग्णालय आपल्या दारी’ या योजनेबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. “नागपुरात खणिकर्मचा निधी उपलब्ध आहे, त्यातून ‘रूग्णालय आपल्या दारी’ ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यामाध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्यव्यस्था दारी मिळेल,” असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

Story img Loader