Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असणार आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या कंटेनर जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानत वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं म्हणत वाढवण बंदर प्रकल्पानंतर आता पालघरमध्ये एक विमानतळ उभारण्यात यावं, अशी मागणी फडणवीसांनी केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईमधील पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण एक नंबर ठरलो. आता त्याहीपेक्षा तीनपट मोठं वाढवण बंदर तयार होत आहे. गेले ३० ते ४० वर्ष आपण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे एक नंबर ठरलो. मात्र, आता वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र एक नंबर राहील. हे सर्व फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
abhyanagsnan on narak Chaturdashi
बालमैफल: अभ्यंगस्नान
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “लीड कितीचा असेल हे…”, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
hug rule in new zealand airport
मिठी मारा; पण तीन मिनिटंच…. ‘या’ विमानतळानं लागू केला अजब नियम, प्रवाशांनी व्यक्त केला रोष
Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…

हेही वाचा : Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

“वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोर्टचा दर्जा दिला. यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जिंकलो. आज ही परिस्थिती आहे की, या वाढवण बंदराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. कोणत्याही देशाच्या इतिहासात एक असा व्यक्ती असतो की तो व्यक्ती देशाच्या विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरतो. वाढवण बंदरामुखे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देखील इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. भारताला पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“मी आज एक विनंती करू इच्छितो. जगभरात अनेक ठिकाणी विमानतळं अशा प्रकारे तयार केलेले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई अजून वाढणार आहे. वसई विरार, पालघर या ठिकाणीही मुंबई वाढेल. आज आपण वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहोत. याचबरोबर आपण विमानतळाबाबतचा निर्णय देखील घेतला आणि पालघरमध्ये तिसरं मोठं विमानतळ उभारलं तर आपण मुंबईला नक्कीच बदलू शकतो”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

स्थानिकांसाठी या बंदराचे लाभ काय?

बंदरामुळे प्रत्यक्ष १२ लक्ष व अप्रत्यक्ष एक कोटी रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) तिपटीने वाढेल असा दावा करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने पालघर, डहाणू तालुक्यातील स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कामकाज मिशन मोडवर हाती घेण्यात येणार आहे.